बाजार विभाग

नियमन व अनुज्ञप्ती

बाजार समितीच्या बाजार आवारातील वेगवेगळे बाजार घटक जसे अबते, व्यापारी, मापाडी, हमाल, वाहतुकदार, खरेदीदार इ. घटकांना नवीन अनुज्ञप्ती देणे व नुतनीकरण करणे व बाजार समितीची रचना व उपविधी बाबतची कामे सदर विभागाकडून पाहिली जातात. उपसचिव हे सदर विभागाचे प्रमुख असून एक सहा. सचिव व कर्मचारी यांच्यामार्फत सदर विभागाचे कामकाज पाहिले जाते.

मालमत्ता शाखा

बाजार समितीच्या मालकीच्या सर्व मालमत्ता, दीर्घ मुदतीच्या लीजवर, भाडयाने देणे, तसेच मालमत्तांचे हस्तांतरण इ. बाबी या विभागाकडून पाहिल्या जातात. उपसचिव हे सदर विभागाचे प्रमुख असून एक सहा. सचिव व कर्मचारी यांच्यामार्फत सदर विभाचे कामकाज पाहिले जाते.

आस्थापना/प्रशासन शाखा

बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचे आस्थापना विषयक बाबी तसेच बाजार समितीच्या सभा, वाहन व्यवस्था इ. कामे सदर विभागांकडून पार पाडली जातात. उपसचिव हे सदर विभागाचे प्रमुख असून एक सहा. सचिव व कर्मचारी यांच्यामार्फत सदर विभाचे कामकाज पाहिले जाते.

अभियांत्रिकी विभाग

बाजार समितीतील सर्व विकास कामे व बाजार समितीच्या मालमत्तांची देखभाल व दुरूस्तीचे कामकाज अभियांत्रिकी विभागामार्फत पार पाडले जाते. अधिक्षक अभियंता हे सदर विभागाचे प्रमुख असून दोन कार्यकारी अभियंता, १० उपभियंता व कनिष्ठ अभियंता असे अधिकारी या विभागात कार्यरत आहेत.

लेखा शाखा

बाजार समितीतील आर्थिक बाबीविषयीचे सर्व कामकाज लेखाशाखेमार्फत पार पाडले जाते यामध्ये वेतन, सर्व देयके प्रदान करणे, बाजार समितीची अर्थिक पत्रके तयार करणे, अंदाज पत्रके तयार करणे इत्यादींचा समावेश होतो. मुख्य लेखाधिकारी हे सदर विभागाचे प्रमुख असून लेखाधिकारी व दोन सहा. लेखाधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत सदर विभागाचे कामकाज पाहिले जाते.

वसुली विभाग

बाजार समितीस येथे असलेल्या थकीत रक्कमांच्या वसुलीचे, आयात-निर्यात तसेच दैनंदिन बाजारभाव जमा व प्रसारीत करणे ही कामे सदर विभागाकडून पाहिली जातात, उपसचिव हे सदर विभागाचे प्रमुख आहेत.

सुरक्षा विभाग

बाजार समितीची सर्व बाजार आवारे व मालमत्ता यांचे रक्षण करणे, वाहतूक व्यवस्थापन करणे, चोरी व इतर अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून दक्षता घेणे इ. कामे सदर विभागाकडून पार पाडली जातात. मुख्य सुरक्षा अधिकारी हे सदर विभागाचे प्रमुख असून दोन सुरक्षा अधिकारी व बाजार समितीचे ४५ रखवालदार व सुरक्षा रक्षक मंडळ यांच्याकडील २३७ सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत सदर विभागाचे कामकाज पाहिले जाते.

माहिती व तंत्रज्ञान विभाग

बाजार समितीच्या बाजार आवारातील आवक नोंद करणे, आकारणी पत्रके तयार करणे, कर्मचारी वेतन इ. बाबी साठी बाजार समितीकडून संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली असून सदर संगणक प्रणालीचे व्यवस्थापन व बाजार समितीच्या मालकीचे संगणक प्रिंटर इ. ची दुरुस्ती व देखभाल हे काम सदर विभागाकडून पाहिले जाते. सॉफ्टवेअर इंजिनिअर हे सदर विभागाचे प्रमुख असून सि.सि. एनालिस्ट, प्रोग्रामर, क. प्रोग्रामर व कर्मचारी यांचेमार्फत सदर विभागाचे कामकाज पाहिले जाते.

दक्षता विभाग

नियमनाखालील शेतमालाची होणा-या अवैध वाहतूकीस आळा घालये, तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे इ. कामकाज केले जाते. उपसचिव हे या विभागाचे प्रमुख आहेत.

विधी शाखा

बाजार समितीच्या वतीने विविध न्यायालयातील प्रकरणामध्ये बाजार समितीची बाजू मांडाजे इ. कामे सदर विभागाकडून केली जातात. विधी अधिकारी हे सदर विभागाचे प्रमुख आहेत.

वैद्यकीय कक्ष

समितीचे अधिकारी/ कर्मचारी, बाजार आवारातील व्यापारी, अडते, हमाल, मापाडी व इतर घटकांचे वैद्यकीय सेवेसाठी सदरच्या कक्ष कार्यरत असून एक वैद्यकीय अधिकारी व महा. वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत सदर विभागाचे कामकाज पाहिले जाते.

स्वच्छता विभाग

बाजार समितीची बाजार आवारातील साफसफाई, स्वच्छता गृहांची स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी १ वैद्यकीय अधिकारा-धनकचरा, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व कर्मचा-यांच्या मदतीने सदर विभागाचे कामकाज पाहिले जाते.

भांडार कक्ष

बाजार समितीच्या विविध बाजार आवार व विभागांकरिता अत्यावश्यक असणारी छापील स्टेशनरी, कार्यालयीन लेखन साहित्य आणि स्टेशनरी, फर्निचर, संगणक, संगणकीय साहित्य व इलेक्ट्रीक साहित्य इत्यादी एकाच ठिकाणी खरेदी करुन साठवणुक करणे, अविक्रेय माल नोंद वहीत त्यांच्या नोंदी घेऊन खरेदीच्या कामात सुश्रुतता येण्याच्या दृष्टीने भांडार कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. भांडार कक्षाचे कामकाज १ उपसचिव, १ कॉम्पुटर प्रोग्रामर, ३ कनिष्ठ लिपिक यांच्या मदतीने पाहिले जाते.

घनकचरा विभाग

बाजार समितीची बाजार आवारातील साफसफाई, स्वच्छता गृहांची स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी १ वैद्यकीय अधिकारा-धनकचरा, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व कर्मचा-यांच्या मदतीने सदर विभागाचे कामकाज पाहिले जाते.