ई-गव्हर्नन्स हे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती चे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती बऱ्याच दिवसांपासून एकात्मिक सॉफ्टवेअर वापरत आहे, जसे की आवक, बाजार फी मूल्यांकन, पावत्या इत्यादी (१९९४ पासून). नवीन वेब आधारित संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती चे संगणक आणि संबंधित उपकरणे २००३ ते २००४ दरम्यान खरेदी केले गेले आहेत, त्यामुळे दिलेली प्रणाली जुनी आहे. कृ.उ.बा.स चे सध्याचे प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर १९८७ ते १९९४ मध्ये जुन्या प्रोग्रामिंग भाषेत विकसित केले गेले आहे. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या (MSAMB) ई-नाम, ई-टेंडरिंग प्रणाली आणि ई-मार्केटिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी नवीन प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती पहिल्या टप्प्यात कांदा बटाटा मार्केटसाठी GOI चे ई-नाम पोर्टल वापरत आहे. यासाठी समर्पित लीज्ड लाईन भाड्याने घेतली आहे.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती ची वेबसाइट विकसित करणे
कृषि उत्पन्न बाजार समिती सर्व घटकांना आवश्यक माहिती तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बास ने अद्यावत अशी मराठी व इंग्रजी भाषेमध्ये विकसित केलेली आहे
इलेक्ट्रॉनिक्स डिस्प्ले बोर्ड
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये आवक आणि दरांची माहिती प्रकाशित करण्यासाठी प्रशासकीय इमारत आणि मार्केट २ (धान्य मार्केट) मध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड बसवण्यात आले आहेत.
सामाजिक माध्यमे (सोशल मीडिया)
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती ने संस्थेच्या उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आपले फेसबुक पेज आणि ट्विटर पेज तयार केले आहे.
