मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (APMC) ही विशिष्ट अधिसूचित कृषि/ फलोत्पादन/पशुधन उत्पादनांच्या व्यापारासंबंधात राज्य शासनाने गठित केलेली एक वैधानिक बाजार समिती आहे. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न (पणन, नियमन व विकास) अधिनियम, १९६३ च्या तरतुदीनुसार १५ जानेवारी, १९७७ रोजी झाली. सदर कायद्याच्या कलम १२ अन्वये ही एक निगमित संस्था आहे. इतरांबरोबरच, मुंबई APMC स्थापनेची मुख्य उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत - कृषि मालासाठी आधुनिक बाजार आवार विकसित करणे, कृषि मालाच्या विपणनाचे नियमन करणे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळण्यास मदत करणे, व्यापाराच्या सुव्यवस्थित विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, बाजारांचे व्यवस्थापन व देखरेख करणे आणि बाजार क्षेत्रातील बाजारांच्या वापरासाठी अटी व शर्ती निश्चित करणे. समितीची स्थापना कृषि आणि काही इतर उत्पादनांच्या विपणनाचे नियमन करणे, त्यासाठी बाजारपेठांची स्थापना करणे आणि त्यानुषंगिक प्रयोजनांसाठी या उद्देशाने करण्यात आली आहे.
सर्व माहितीसाठी....
